20 September 2018

News Flash

वाढदिवसालाच होणार दीपिकाचा साखरपुडा?

दीपिका आणि रणवीरने रिलेशनशिपविषयीच्या प्रश्नांची नेहमीच टाळाटाळ केली

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग

बॉलिवूड वर्तुळात मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेही चर्चेत असणारी ही जोडी काही दिवसांतच साखरपुडा करण्याची चिन्हं असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. ‘गोलियों की रासलीला राम- लीला’ या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकलेल्या या जोडीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांच्या रिलेशनशिपच्याच चर्चांनी कलाविश्वातील गप्पांचे फड रंगू लागले.

HOT DEALS
  • Honor 8 32GB Pearl White
    ₹ 14210 MRP ₹ 30000 -53%
    ₹1500 Cashback
  • Vivo V7+ 64 GB (Gold)
    ₹ 16990 MRP ₹ 22990 -26%
    ₹900 Cashback

सध्याही दीपिका तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५ जानेवारीच्या दरम्यान श्रीलंकेला जाणार असल्याचे म्हटले जातेय. बॉलिवूडच्या या ‘मस्तानी’चा यंदाचा वाढदिवस खूपच खास असून, रणवीर आणि ती या खास दिवसाचे औचित्य साधत साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. तेव्हा आता ५ जानेवारी याच दिवसाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

चित्रपटांच्या निमित्ताने एकमेकांना ओळखू लागलेले रणवीर आणि दीपिका या दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याचे म्हटले जातेय. गेल्या बऱ्याच वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना डेट करत असून आता नात्यात पुढची पायरी चढत ते साखपुडा करतात का, याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. दीपिका आणि रणवीरच्या नात्याविषयी सर्वांनाच माहिती असली तरीही या दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केलेला नाही. रिलेशनशिपविषयी कोणतेही प्रश्न विचारले असता त्या दोघांनीही मोठ्या कौशल्याने या प्रश्नाची उत्तरे देण्यात टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळाले.

First Published on January 3, 2018 4:07 pm

Web Title: rumors bollywood actress deepika padukone and actor ranveer singh to get engaged soon