खिलाडी कुमार सध्या चर्चेत आहे, तो त्याच्या ‘रुस्तम’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने. ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्वरही या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॉलीवुडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. प्रेम, वैर, सूड, देशभक्ती अशा चौफेर विषयांना हात घालणाऱ्या ‘रुस्तम’च्या पोस्टर्सपासून त्याचा रेडिओ ट्रेलर, ट्रेलर आणि चित्रपटातील सर्व गाणीही निर्विवादपणे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
चित्रपटाचे थरारक कथानक साकारत १९५९ च्या काळतील बहुचर्चित नानावटी केसवर दृष्टीक्षेप टाकणारा हा चित्रपट अक्षय कुमारसाठीही तितकाच जवळचा आहे. त्याने याआधी साकारलेल्या भूमिका पाहता नौदल अधिकाऱ्याच्या रुपात युद्धनौकांवर चित्रीकरण करण्याचा थरार अक्षयने एका व्हिडिओद्वारे त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केला आहे. यापूर्वीही ‘रुस्तम’मधील इलियानाच्या भूमिकेसाठी तिच्या बहिचर्चित वेशभूषेचा उलगडा करणारा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता. चित्रपटाच्या तगड्या प्रसिद्धीमुळे तरी सध्या ‘रुस्तम’ बाबत सबंध चित्रपट वर्तुळात सिनेकलाकारांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. ‘एअरलिफ्ट’ मधून एका संवेदनशील भारतीयाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा खिलाडी कुमार ‘रुस्तम’ या चित्रपटातून रुस्तम पावरी या नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ‘थ्री शॉट्स दॅट शॉक्ड् द नेशन’ अशा ‘टॅगलाइनसह’ टिनू सुरेश देसाईच्या दिग्दर्शनात बललेल्या या चित्रपटात अक्षय कुमारसह इलियाना डिक्रूज, एशा गुप्ता, अर्जुन बाजवा हे कलाकारही दिसणार आहेत.
While there were many memorable moments during the shoot,this one definitely stands out 4 me,watch #RustomOnWarship https://t.co/p5fd8O2KFk
— Akshay Kumar (@akshaykumar) July 25, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.