राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सचिन कुंडलकरसाठी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या एकत्र येत आहेत.
सचिनच्या आगामी ‘वजनदार’ या चित्रपटात सई आणि प्रिया काम करणार आहेत. या दोघी त्यांच्या आगळ्या वेगळ्या मैत्रीचे दर्शन ‘वजनदार’ या चित्रपटाद्वारे दाखवणार आहेत. या चित्रपटासाठी दोघींनी आपला लुक बदलल्याचेही कळते. याची प्रचीती आपल्याला चित्रपट पाहताना येईलच.
या चित्रपटाची निर्मिती विधी कासलीवाल आणि सचिन कुंडलकर एकत्रितपणे करत आहेत. प्रिया आणि सई व्यतिरिक्त या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील व चितन चिटणीस प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान सध्या या सिनेमाबद्दल आणि त्यातल्या यांच्या भुमिकांबद्दल कमालीची गुप्तता पाळली जातेय
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2015 रोजी प्रकाशित
‘वजनदार’ सई आणि प्रिया!
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या एकत्र येत आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 22-12-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai and priya team up for sachins next