News Flash

सैफच्या मुलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण, लवकरच बॉलीवूडमध्ये एण्ट्री?

साराने २०१२ साली सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एका पार्टीत मॉडेलिंग देखील केले होते.

सैफने साराला बॉलीवूडमध्ये येण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. (Photo Source: Instagram)

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा हिने कोलंबिया विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. साराची आई आणि सैफची पहिली पत्नी अमृता सिंगचा मित्र फॅशन डिझायनर संदीप खोसलाने साराने पदवीग्रहण केल्याचे छायाचित्र पोस्ट केले आहे. साराच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफने साराला बॉलीवूडमध्ये येण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

याआधी साराने २०१२ साली सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एका पार्टीत मॉडेलिंग देखील केले होते. याशिवाय, अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ इशान कपूरसोबत सारा बॉलीवूडमध्ये एण्ट्री करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. निर्मात करण जोहर दोघांना एका चित्रपटातून एकत्र आणणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, साराचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैफने आपल्या मुलीसाठी खास डिनर पार्टी देखील ठेवली होती. सारा भारतात दाखल झाल्यानंतर सैफने आपल्या लाडक्या मुलीसाठी डिनरचे आयोजन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:14 pm

Web Title: saif ali khan daughter sara completes graduation
टॅग : Entertainment,Loksatta
Next Stories
1 कलाकृतीपेक्षा मोठे होण्याचा अट्टाहास असू नये
2 फ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…
3 नागराज मंजुळेच्या नावाने पसरवल्या जातायत या अफवा..
Just Now!
X