News Flash

सैफचा हा ‘क्यूट’ व्हॉट्स अॅप डिपी पाहिलात का?

जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सैफ युरोपला रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या आयुष्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले. सैफिनाच्या बाळाचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूडकरांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्षात करिनाची भेट घेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बाळाच्या जन्मानंतर करिना आणि सैफने त्यांच्या बाळाचे नाव तैमुर ठेवले होते. सध्या कपूर कुटुंबातच नाही, तर बॉलिवूड विश्वात आणि सर्वच चाहत्यांमध्येही तैमुरविषयीच्याच चर्चा रंगत आहेत. सैफच्या या छोट्या नवाबाची पहिली झलक जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हाही चाहत्यांनी तैमुरच्या फोटोला पसंती दिली होती. बाळाच्या येण्याने सध्या प्रचंड आनंदात असणाऱ्या सैफ तैमुरला फार काळासाठी स्वत:पासून दूर ठेवत नाहीये. सैफने तैमुरसाठी खास खोलीची सजावटही करून घेतली होती. त्यानंतरच तैमुरवरचे त्याचे प्रेम व्यक्त झाले ते म्हणजे व्हॉट्स अॅप डिपीतून.

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सैफने त्याच्या व्हॉट्स अॅपचे डिसप्ले पिक्चर म्हणजेत डिपी म्हणून एक सुंदर असा कार्टूनचा फोटो ठेवला आहे. या डिपीमुळे सैफचे त्याच्या बाळाप्रती असलेले प्रेम व्यक्त होत आहे असेच म्हणावे लागेल.

छाया सौजन्य- मुंबई मिरर छाया सौजन्य- मुंबई मिरर

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर लवकरच त्यांच्या छोट्या नवाबासह म्हणजेच तैमुरसह युरोपला रवाना होणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये सैफ त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र होणार असून या चित्रपटाचे चित्रिकरण युरोपमध्ये करण्यात येणार आहे असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे. सैफ त्याच्या आगामी ‘शेफ’ या चित्रपटासाठी युरोपला जात आहे. सैफसोबत त्याला साथ देण्यासाठी बेगम करिना आणि छोटे नवाब तैमुरसुद्धा तेथे जाणार आहेत.

पाहा: फोटोः तैमुरच्या जन्मानंतर सैफिनाची पहिली डिनर डेट

जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सैफ युरोपला रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सैफ कोणत्याही परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला एकटे सोडू इच्छित नाहीये. तैमुरच्या जन्मानंतर शक्य तितका वेळ तो कुटुंबासोबतच व्यतीत करण्यास प्राधान्य देत आहे. अशी माहिती सैफिनाच्या निकटवर्तीयांनी दिल्याचे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले होते. दरम्यान, तैमुरच्या जन्मानंतर काही दिवसांनीच ख्रिसमसच्या निमित्ताने सैफिनाने त्यांच्या मित्रपरिवारासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये विविध कलाकार आणि सैफिनाच्या कुटुंबियांनीसुद्धा हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 4:44 pm

Web Title: saif ali khans whats app dp says that son taimur ali khan is on his mind all the time
Next Stories
1 बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने १२ वाजता सलमानला दिल्या होत्या शुभेच्छा
2 नोटाबंदीच्या निर्णयाचा ‘दंगल’वर खरंच परिणाम नाही?
3 ट्विटरवर शब्दांच्या खेळात उदयवर भारी पडला शाहरुख
Just Now!
X