मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या वर्षी एक वादळ आले. या वादळाने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर परदेशातील नागरिकांनाही तडाखा दिला. पण, हा तडाखा कोणाचे नुकसान करणारा नसून लोकांचे मनोरंजन करणारा होता. आम्ही बोलतोय, मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सैराट या चित्रपटाबद्दल. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने चित्रपटसृष्टीला आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे दोन हरहुन्नरी कलाकार दिले. या जोडीने लहानांपासून ते मोठयांपर्यत सगळ्यांनाच याडं लावलं होतं. आजही या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.

सैराटनंतर आर्ची आणि परश्याची भूमिका साकारणा-या रिंकू आणि आकाशला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले. रिंकू लवकरच ‘सैराट’ चित्रपटाचा कन्नड रिमेक असलेल्या ‘मनसु मल्लिगे’ मध्ये झळकणार आहे. तर आकाश ठोसर हा महेश मांजरेकर यांच्या आगामी एफयू चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याचेही चित्र आहे. इन्स्टाग्राम या सोशल साइटवर आकाश त्याच्या या चित्रपटाच्या चित्रिकरणातील घडामोडीविषयी फोटोंच्या माध्यमातून माहिती देत असतो. दरम्यान, नुकतेच या चित्रपटातील एक गाणे चित्रीत करण्यात आले. या गाण्याच्या चित्रिकरणाचा व्हिडिओ मराठी सिनेयुगने टाकला आहे.

आकाशच्या या आगामी चित्रपटात त्याच्यासोबत महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, माधुरी देसाई यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तरूण कलाकारदेखील या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये माधव देवचक्के, मयुरेश पेम, मधुरा देशपांडे अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/BPhTE10j_M-/

https://www.instagram.com/p/BPampc3jx_q/

https://www.instagram.com/p/BPSFmhcjWC4/

https://www.instagram.com/p/BPAHg4uDqEu/