News Flash

“कोणी मला खान आडनावाने बोलवू नये म्हणून..,” साजिद वाजिद मधील साजिदचा मोठा खुलासा

जाणून घ्या काय आहे या मागचं कारण

संगीत विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे साजिद-वाजिद यांची जोडी जी गेल्या वर्षी तूटली. गेल्या वर्षीसंगीत म्युजिक डायरेक्टर वाजिद खान यांनी ४३ व्या वयात शेवटचा श्वास घेतला. वाजिद खानच्या निधनानंतर साजिद-वाजिद यांची जोडी तूटली, परंतू नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साजिद खान यांनी साजिद-वाजिद ही जोडी तुटली नाही असं वक्तव्य केलं आहे.

“लोकांनी मला साजिद खान म्हणावे अशी माझी इच्छा नाही, म्हणूनच मी वाजिदला माझ्या नावापुढे आडनाव म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. माझे नाव साजिद वाजिद आहे आणि शेवटपर्यंत राहील. मला नेहमीच वाजिद माझ्या आजूबाजूला असल्यासारखे वाटते. मी म्युजिक कंपोज करायला सुरूवात केली आहे, परंतु मी असे कधी करेन असे मला वाटले नव्हते. हे सगळं त्याच्यामुळेच आहे,” असे साजिद म्हणाले.

साजिद पुढे म्हणाले, “मला वाटतं की त्यावेळी वाजिद माझ्यासोबत असतो. आम्ही तीन भाऊ होतो. वाजिद, जावेद आणि मी. जेव्हा आमचे वडील ठीक नव्हते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले होते की तुमच्यामध्ये काहीही येऊ देऊ नका. त्यांना आमच्या तिनही भावडांचं एक उदाहरण द्यायचे होते. आजकाल पैसा, पावर आणि करिअरला खूप महत्त्व दिले जाते. भाऊ-बहीण एकमेकांना भेटतही नाहीत. मुलं त्यांच्या वृध्द आई-वडीलांची काळजी देखील नाही करतं. पण, आम्ही असे नाही आहोत. आम्ही एकमेकांशी खूप जोडलेले आहोत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sajid Wajid (@thesajidwajid)

पुढे साजिद म्हणाला, “मी आणि वाजिद खूप जवळ होतो. आयसीयूमध्ये मी त्याला पीपीई किट परिधान करून भेटलो. तेव्हा एक अशी वेळ आली की मला वाटले की मी निघून जायला पाहिजे. मी त्याच्याबरोबर जायला पाहिजे. तो गेल्या पासून हा रिकामा वेळ भरून काढणे कठीण झाले आहे. मी जेव्हा त्याला गमावले तेव्हा मी सलमान भाईला सांगितले की माझ्याकडून आता काही होईल किंवा काही करण्याची ताकद माझ्यात राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीत मला त्यांनीच सांभाळलं आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 5:08 pm

Web Title: sajid khan says i dont want people to call me so i have adopted wajid as my surname dcp 98
Next Stories
1 “फक्त लग्नासाठी मुलगी घेऊन ये…मंत्र मी वाचतो”- सोनू सूद
2 बर्थडे स्पेशल: “बॉलिवूडमध्ये माझा मित्र कोण माहित नाही पण माझा शत्रू तरी कुणी नाही?”
3 राखी सावंतच्या नवऱ्याचं रहस्य उलगडणार?
Just Now!
X