13 July 2020

News Flash

सलमान कोटय़धीश

सध्याचा जमाना स्मार्ट मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट आणि फेसबुकचा आहे. तरुणांबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या सगळ्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.

| September 21, 2014 12:40 pm

सध्याचा जमाना स्मार्ट मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट आणि फेसबुकचा आहे. तरुणांबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या सगळ्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. तरुणांमध्ये या सगळ्याची असलेली क्रेझ लक्षात घेऊन बॉलीवूडमधील अनेक तारे आणि तारकांनीही माहिती-तंत्रज्ञानाच्या या आधुनिक गोष्टींचा आधार घेतला आहे. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून ही मंडळी आपल्या चाहत्यांशी हितगुज करीत असतात. या सगळ्यांमध्ये बॉलीवूडच्या ‘खान’दानातील सलमान खानने बाजी मारली आहे. ‘फेसबुक’वरील सलमान खानच्या पेजला २ कोटींहून अधिक ‘लाइक्स’ मिळाले आहेत.
‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांच्यापासून ते बॉलीवूडमधील लहानात लहान कलाकार आता ‘फेसबुक’, ट्विटर’ यासारख्या सोशल मीडियाच्या साइट्सवरून सातत्याने चाहत्यांसमोर राहण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे बच्चन यांच्यासह आमिर खान, शाहरुख खान आणि अन्य अनेक बॉलीवूड स्टार्स फेसबुक आणि ट्विटरवर आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये सलमान खान सगळ्यात पुढे आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सलमान खानच्या फेसबुक पेजला १ कोटी ९० लाख इतक्या लाइक्स होत्या. केवळ पंधरा दिवसांत दहा लाख लाइक्स मिळून सलमानने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांना फेसबुकवर दीड कोटींहून अधिक तर शाहरुख खान याला दोन कोटी इतक्या लाइक्स मिळाल्या आहेत. पण सलमानच्या तुलनेत ही मंडळी मागे आहेत. फेसबुकवर सर्वाधिक लाइक्स मिळवून सलमानने येथेही आपणच ‘दबंग’ असल्याचे दाखवून दिले असल्याचे सलमानच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2014 12:40 pm

Web Title: salman khan assets grows to crores
Next Stories
1 पोस्टमनचे भावविश्व ‘टपाल’ बंद
2 रेखा सुपर नानी!
3 ‘प्रभात’चे सहस्त्रचंद्रदर्शन!
Just Now!
X