News Flash

दीपिकासोबत आतापर्यंत चित्रपट न करण्यामागचे सलमानने सांगितले कारण

मात्र आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने याला अपवाद ठरली आहे.

दीपिकासोबत आतापर्यंत चित्रपट न करण्यामागचे सलमानने सांगितले कारण

सुपरस्टार सलमान खानसोबत आतापर्यंत सगळ्याच टॉप अभिनेत्रींनी काम केले आहे. मात्र आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने याला अपवाद ठरली आहे. सलमान आणि दीपिकाची जोडी अद्याप रुपेरी पडद्यावर पहायला मिळाली नाही. या जोडीला एकत्र पहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या मुलाखतीमध्ये सलमानला दीपिकाशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरे देताना सलमानने दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याचबरोबर इतक्या वर्षांत  आम्हा दोघांना चित्रपटात एकत्र आणण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही याची खंतही त्याने व्यक्त केली होती. ही जोडी संजय लीला भन्साळी यांच्या ईन्शाल्ला चित्रपटात एकत्र दिसणार अशी चर्चा होती. त्यामुळे या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते पण या चित्रपटात दीपिकाऐवजी आलियाची वर्णी लागली आणि दोन सुपरस्टार्सना एकत्र पाहण्याची चाहत्यांची संधी हुकली.

आतापर्यंत दीपिकासोबत त्याने का काम केले नाही असा प्रश्नही सलमानला विचारण्यात आला होता त्यावेळी  दीपिकासोबत काम करण्यासाठी चित्रपटाची कथादेखील रंजक असायला हवी आणि सध्या माझ्याकडे अशी कोणतीच कथा नव्हती असे त्याने  सांगितले.

‘भारत’ चित्रपटाला प्रियांका चोप्राने नकार देताच दीपिकाच्या नावाची चर्चा झाली होती. परंतु त्याच दरम्यान दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग लग्न बंधनात अडकणार असल्याने दीपिकाने या भूमिकेसाठी नकार दिला. आता या चित्रपटात कतरिना कैफ सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच सलमान या चित्रपटामध्ये व्यग्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 12:10 pm

Web Title: salman khan giving reason why he is not working with deepika
Next Stories
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता
2 ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातार लवकरच रुपेरी पडद्यावर
3 … म्हणून जॅकी चॅनला वाटते या गोष्टीची खंत
Just Now!
X