News Flash

Bharat teaser : ‘कुछ रिश्ते जमीन से होते है’, सलमानच्या ‘भारत’ची झलक पाहिलीत का?

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर 'भारत' आधारलेला आहे.

Bharat teaser

भारतासाठी आणि सलमानच्या ‘भारत’साठीही आजचा दिवस खास आहे, म्हणून या खास दिवसांचं औचित्य साधून सलमाननं त्याच्या आगामी ‘भारत’चा टीझर प्रदर्शित केला आहे. ५० सेकंदाचा ऑडिओ व्हिज्युअल टीझर सलमाननं ट्विटरवर शेअर केला आहे.

‘कुछ रिश्ते जमीन से होते है, और कुछ खून से.. मेरे पास दोनो थे’ असं म्हणणाऱ्या ‘भारत’ची छोटीशी झलक चाहत्यांना या टीझरच्या निमित्तानं पाहायला मिळाली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. प्रियांका चोप्रानं काही दिवसांपूर्वीच ‘भारत’ला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता.

‘भारत’मध्ये दिशा पटानी, कतरिना कैफ, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. २०१९ मध्ये ईदच्या दिवशी भारत प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:14 pm

Web Title: salman khan share bharat teaser on independence day
Next Stories
1 सारा अली खानचं इन्स्टाग्रामवर पदार्पण
2 pataakha Trailer : भारत- पाकिस्तान होणार का एक; ‘पटाखा’मध्ये सख्ख्या बहिणी पक्क्या वैरीणींची कथा
3 Independence Day 2018: ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, सेलिब्रिटींचा स्वातंत्र्यदिन
Just Now!
X