News Flash

सलमानने शेअर केला कब्रस्तानचा फोटो; पण का? जाणून घ्या कारण

हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे

सलमान खान

करोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक घरातच अडकला आहे. यामध्ये अभिनेता सलमान खानदेखील त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये अडकला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्याविषयी आणि देशभरात करोनाशी निगडीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत आहे. यातच त्याने अलिकडे कब्रस्तानचा एक फोटो शेअर केला आहे. सलमानने हा फोटो शेअर केल्यापासून अनेकांना प्रश्न पडला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलं आहे. तसंच सोशल डिस्टंसिंग ठेवण्याचीही वारंवार सुचना करण्यात येत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे, महाविद्यालये,ऑफिस सारं काही बंद आहे. यामध्येच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कब्रस्तानही बंद ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. याच गोष्टीचं कौतूक सलमानने केलं असून त्याने फोटो शेअर केला आहे.

“कब्रस्तानचा फोटो शेअर करत सलमानने आभार मानले आहेत. उत्तम! सध्या देशातील परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घेतलेल्या निर्णयाबद्दल मनापासून धन्यवाद. देव सर्वांचं रक्षण करो हीच प्रार्थना. #IndiaFightsCorona” , असं कॅप्शन देत सलमानने हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सलमानचा हा फोटो पाहून सर्व स्तरांमधून कब्रस्तानने घेतलेल्या निर्णयाचं कौतूक केलं आहे.

दरम्यान, सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे सर्व क्षेत्रातील कामकाज बंद आहे. याच चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे.  अनेक चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर थांबलं आहे. तर काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्येही देशावर ओढावलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. अनेकांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सलमानने देखील २५ हजार कामगारांना मदत करण्याचं काम हाती घेतलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 11:23 am

Web Title: salman khan shares photo of the closed cemetery ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘अब तेरा रोना शुरू हो जाएगा’; करोनावर जॉनी लिव्हर यांचं भन्नाट गाणं
2 ‘केदारनाथ’मधील जोडी पुन्हा एकत्र येणं अशक्य; सुशांत सिंह राजपूतचा मोठा निर्णय
3 मदतीचा हात पुढे करुनही अक्षय कुमार पिछाडीवर, पाहा लोकप्रियतेत कोणी केली मात
Just Now!
X