‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००७ साली सुरु झालेल्या ‘बिग बॉस’ हिंदीचे सध्या १३वे पर्व सुरु आहे. यावरुनच या शोची लोकप्रियता आपल्या लक्षात येते. परंतु ‘बिग बॉस’च्या या प्रचंड लोकप्रियतेमागे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आहे. सलमानचे सूत्रसंचालन या शोचे विशेष आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. परंतु सलमान आता ‘बिग बॉस’मधून निवृत्ती घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर आता स्वत: सलमानने प्रतिक्रिया दिली आहे.

Video : एकटक पाहणाऱ्या कार्तिक आर्यनमुळे तरुणी वैतागली, अन्..

काय म्हणाला सलमान खान ?

“होय, मी ‘बिग बॉस’ सोडण्याचा विचार करतोय. गेली १३ वर्ष मी या शोचे सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे एकाएकी ‘बिग बॉस’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपा नाही. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले. परंतु कुठेतरी थांबावेच लागते. त्यामुळे आता मी या शोमधून निवृत्ती घेण्याचा विचार करतोय.” अशी प्रतिक्रिया सलमानने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत दिली.

‘हा’ आहे बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार, एका वर्षात केली तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई

सलमान गेल्या काही काळापासून ‘ट्रिजेमिनल न्यूरेल्जिया’ (Trigeminal Neuralgia) या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्यानं जास्त ताण घेणं त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मागच्या काही आठवड्यांपासून सलमान बिग बॉसमध्ये रागावलेला व तणावाखाली दिसत होता. एका एपिसोडमध्ये तर रागात त्याने स्वत:चं जॅकेटसुद्धा फेकून दिलं होतं. यामुळे सलमानचे कुटुंबीय त्याच्या तब्येतीसाठी चिंतेत आहेत.