बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपट बॉक्स ऑफीसवर काही खास कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने जेमतेम शंभर कोटींच्या घरात कमाई केली. सलमान खानने कलर्सच्या चॅनलवर प्रसारित होणा-या ‘मिशन सपने’ या रिअ‍ॅलिटी शोसोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो गॅलरीः चाहत्यांसाठी सेलिब्रिटी उतरले रस्त्यावर

या शोमध्ये सलमान खान चक्क रस्त्यावर लोकांचे केस कापताना दिसणार आहे. सलमान काय काय करेल याचा अंदाज बांधता येणे कठीणच आहे. त्याने रस्त्यावर लोकांचे केसच नाही कापले तर एका तरूणीच्या डोक्याची मालिशदेखील केली. तुम्हाला वाटतं असेल की अभिनेय क्षेत्र सोडून सलमान बार्बर म्हणजेच केस कापणारा झाला की काय? तर घाबरू नका तुमच्या आवडत्या अभिनेत्याने बॉलीवूडला राम राम ठोकला नाही. त्याने केस कापण्याचे काम केले ते ‘मिशन सपने’ या चॅरिटी रिअ‍ॅलिटी शोसाठी. या शोमध्ये सर्वसामान्य माणसांच्या इच्छा बॉलीवूडकरांना पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यानुसार एका तरुणीने दबंग स्टारकडून चक्क डोक्याला मालीश करून घेण्याची इच्छा दर्शविली.
या शोच्या अंतर्गत बॉलीवूडकरांना सलून चालवणे, भाजी विकणे, चहाच्या दुकानात काम करणे यांसारखी अनेक काही छोटी-छोटी कामे करावी लागणार आहेत. या शोच्या माध्यमातून सलमानने अपघातात पाय गमावलेल्या कुरबान अली नावाच्या एका गरजू व्यक्तीची मदत केली आहे. सलमानव्यतिरीक्त यात वरूण धवन, द्रीष्टी धामी, हरभजन सिंग, रॉनित रॉय, मिका सिंग यांसारखे सेलिब्रिटी दिसणार आहे.