बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भारत’च्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. त्यातच सलमान आणखी एक नवा बायोपिक करणार असल्याचे समोर आले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच आहे.
‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान नेहमीच देशाभोवती लक्ष केंद्रीत करणाऱ्या कथांच्या शोधात असतो. नुकाताच एका चित्रपट निर्मात्याने बीएसएफ जवानाच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवण्याची इच्छा सलमानपुढे व्यक्त केली. तसेच या चित्रपटात सलमानने काम करावे असे देखील म्हटले. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती सलमानच्या या चित्रपटाची.
‘ही एक साहसी आणि प्रेरणादायी कथा आहे. या कथेमध्ये एक भारतीय सैनिकाने १२ ते १४ वर्षांपूर्वी दहशदवाद्यांचा तळ उध्वस्त केल्याचे दृश्य दाखवण्यात येणार आहे. सलमानला या चित्रपटाची कथा आवडली आणि कधीही समोर न आलेली कथा लोकांसमोर आणयला हवी असे तो म्हणाला आहे. चित्रपटाबाबत सलमानचे तोंडी बोलणे झाले आहे परंतु चित्रपटाच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत’ असे ‘पिंकव्हिला’ने दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे.
दरम्यान, सलमान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार असून अभिनेत्री कतरिना कैफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे.