News Flash

सलमान-शाहरूखच्या ‘करण अर्जुन’ला २० वर्षे पूर्ण!

सलमान खान आणि शाहरूख खानचा अभिनय असलेल्या राकेश रोशन दिग्दर्शित 'करण अर्जुन' चित्रपटाला मंगळवारी (१३ जानेवारी) २० वर्षे पूर्ण झाली.

| January 13, 2015 04:36 am

सलमान खान आणि शाहरूख खानचा अभिनय असलेल्या राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’ चित्रपटाला मंगळवारी (१३ जानेवारी) २० वर्षे पूर्ण झाली. १९९५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट दमदार संवादांसाठी आणि भावांमधील दर्शविण्यात आलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटात वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेणाऱ्या दोन भावांची कथा दर्शविण्यात आली आहे. राखी, काजोल, ममता कुलकर्णी आणि अमरिश पुरी यांच्यादेखील भूमिका असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड यश संपादन केले होते. ‘करण अर्जुन’ चित्रपटाला वीस वर्ष पू्र्ण झाल्याबद्दल चित्रपटप्रेमींनी टि्वटरवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 4:36 am

Web Title: salman shah rukhs karan arjun turns 20
Next Stories
1 गोल्डन ग्लोब पुरस्कारात बॉयहूड, बुडापेस्ट यांची बाजी
2 ‘मेसेंजर ऑफ गॉड’ला सेन्सॉर बोर्डाचा दणका, प्रदर्शनावर बंदी
3 खोटी मुलाखत छापल्याप्रकरणी आमीरकडून संकेतस्थळांना नोटीस
Just Now!
X