News Flash

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने १२ वाजता सलमानला दिल्या होत्या शुभेच्छा

त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास फोन केला होता

सलमान खान

सलमान खानने २७ डिसेंबरला त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. पनवेलच्या फार्म हाऊसवर जवळच्या मित्र परिवारासोबत त्याने हा वाढदिवस साजरा केला. सिनेसृष्टीतल्या इतर कलाकारांनी या भाईजानला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या. यात सलमानचा पार्टनर गोविंदाचे नाव होते. पण यात एक व्यक्ती अशी होती ज्याने रात्री १२ वाजता फोन करुनच भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आता तुम्हाला तो अभिनेता नक्की कोण असा प्रश्न पडला असेल. तो अभिनेता दुसरा कोणी नसून सलमानचा जवळचा मित्र संजय दत्त होता. नुकत्याच एका कार्यक्रमात संजयने सलमानला गर्विष्ठ असे म्हटले होते. त्यामुळे दोघांमध्ये विस्तव जात नाही अशाही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होत्या. पण दोघांच्याही एका मित्राने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात संजय दत्तला एका शब्दात सलमानची ओळख सांगायला सांगितले होते. या प्रश्नावर उत्तर देताना संजय, सलमानला गर्विष्ठ बोलला होता.

संजय तुरूंगातून बाहेर आल्यापासूनच या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सलमान त्याला भेटायला आला नाही याचा संजयला राग आला होता. पण कधी असेही दिवस होते जेव्हा सलमान, संजयकडून अनेक गोष्टींचा सल्ला घ्यायचा. ‘साजन’ या सिनेमातून संजय आणि सलमानने एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच या दोघांची मैत्री झाली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली. यानंतर सलमानने संजय दत्तला ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करण्यासाठीही आपल्यासोबत घेतले होते.

संजय दत्त, ओमंग कुमार याच्या ‘भूमी’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा सिनेमा ४ ऑगस्ट २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. तर सलमानचे पुढच्या वर्षी कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ आणि अली अब्बास जफरचा ‘जिंदा है टायगर’ हे दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 4:30 pm

Web Title: sanjay dutt wished salman khan exactly at 12 on his 51th birthday
Next Stories
1 नोटाबंदीच्या निर्णयाचा ‘दंगल’वर खरंच परिणाम नाही?
2 ट्विटरवर शब्दांच्या खेळात उदयवर भारी पडला शाहरुख
3 फोटोः तैमुरच्या जन्मानंतर सैफिनाची पहिली डिनर डेट
Just Now!
X