शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन केवळ शिवसेनेच्या फायद्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीचं काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे असं म्हणत शिवसेनेचे खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी आरोप खोडून काढले आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन केवळ शिवसेनेच्या फायद्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र ‘या चित्रपटाच्या निर्मितीचं काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी आरोप खोडून काढले आहेत.

‘ठाकरे’ हा चित्रपट शिवसेनेच्या राजकीय फायद्यासाठी काढलेला नाही. गेल्या चार वर्षांपासून चित्रपटावर काम सुरू आहे. ज्यांना हा चित्रपट निवडणुकांच्या फायद्यासाठी काढला असं वाटत असेल त्यांनी वर्षभर निवडणुका पुढे ढकलाव्या असंही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. ‘बाळासाहेब हे काही अपघातानानं झालेले शिवसेनाप्रमुख नव्हते. ते कतृत्त्वानं शिवसेना प्रमुख झाले. अनेक नेते, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान देशात झाले मात्र बाळासाहेबांसारखं  कोणीही होऊ शकलं नाही’ असंही राऊत म्हणाले.

२५ जानेवारीला ‘ठाकरे’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबरोबर आणखी तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते मात्र अन्य दोन चित्रपटांनी दबावामुळे ‘ठाकरे’ चित्रपटासाठी प्रदर्शनाच्या तारीख पुढे ढकलल्या असाही आरोप होत आहे यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळासाहेब स्वत: एक ब्रँड आहे, कोणालाही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलायला आम्ही सांगितलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.