अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. अलिकडेच तिने आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये तिने स्वत:ची तुलना सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याशी केली. या तिच्या पोस्टवर आता अभिनेता वरुण धवन याने प्रतिक्रिया दिली आहे.

सुपर मॉम : मॅचच्या ‘ब्रेक’दरम्यान तिने केलं स्तनपान, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

साराने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिने ब्लॅक अँड व्हाईट शेडमध्ये पोस्ट केलेल्या या फोटोवर एक गंमतीदार शायरी देखील लिहिली आहे.

‘या’ फोटोमुळे सोहाला मागावी लागली सैफची माफी

“इन आंखों की मस्ती,
रेखा जी से है सारा बहुत सस्ती,
लकीली वो अपने आप में है हस्ती,
वह खुद ही यह सारी बातें है करती और वो फस्ती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी शायरी तिने लिहिली आहे. मात्र या शायरीवरुनच वरुन धवन याने साराची खिल्ली उडवली आहे. “बहुदा तुझ्याकडे बराच मोकळा वेळ आहे.” अशा आशयाची प्रतिक्रिया वरुणने दिली.