News Flash

सारा अली खानच्या कारचालकाला करोनाची लागण

सारानेदेखील केली तिची करोना चाचणी; रिपोर्ट्स आले...

गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना किंवा त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. अलिकडेच बच्चन कुटुंबातील काही सदस्यांना देखील करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरातदेखील करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आली आहे. साराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या ड्रायव्हरला करोनाची लागण झाल्याचं तिने सांगितलं आहे. या कारचालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आलं असून साराच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्याचं तिने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

“आमचा कारचालक करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बीएमसीला याविषयी कळवलं असून कारचालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आलं आहे. माझे कुटुंबीय, घरातील स्टाफ आणि माझी करोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु, आमच्या सगळ्यांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील आम्ही काळजी घेत आहोत. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून बीएमसीचे मनापासून धन्यवाद. त्यांना आम्हाला तात्काळ मदत केली आणि यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला. सगळ्यांनी काळजी घ्या”, अशी पोस्ट साराने शेअर केली आहे.

दरम्यान, अलिकडेच अभिनेत्री रेखा यांच्या कारचालकालादेखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्यांचा बंगला सील करण्यात आला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या चौघांनादेखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 8:42 am

Web Title: sara ali khan driver tested covid 19 positive and actress tested negative post viral ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बिग बींसाठी केलेल्या ट्विटमध्ये जूहीने लिहिले ‘आयुर्वेद’, ट्रोल झाल्यावर दिले स्पष्टीकरण
2 आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य
3 Video : अमिताभ यांना करोना झाल्याचं कळताच रामदास आठवलेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X