बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सारा अनेक वेळा तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. आता साराने एका मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन कोण आहे?

साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. यात एक मुलगा उभा असून त्याचा चेहरा दिसत नाही. फक्त त्याची पाठ दिसत आहे. या मुलाचे कुरळे केस आहेत. त्याने गुलाबी रंगाची ‘IGGY 7’ नावाची जर्सी परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत सारा म्हणाली,”ओळखा पाहू कोण आहे हा? ओळखलत का?”

कोण आहे हा मुलगा?

हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साराचा भाऊ इब्राहिम अली खान आहे. इब्राहिम हा क्रिकेट खेळतो आणि ही त्याचीच जर्सी आहे. सारा बऱ्याच वेळा इब्राहिम सोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सारा आणि इब्राहिम हे दोघेही लोकप्रिय स्टारकिड्स आहेत.

सारा अली खानचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सारा सोबत अभिनेता वरूण धवनने मुख्य भूमिका साकारली होती. सारा लवकरच अभिनेता अक्षय कुमार आणि धनुषच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे.