04 March 2021

News Flash

शाहरुख-अनुष्काचे ‘ते’ फोटो होताहेत व्हायरल!

इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुख आणि अनुष्का शर्मा चित्रीकरणाला सुरुवात

शाहरुख आणि अनुष्काच्या आगामी चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि आघाडीची नायिका अनुष्का शर्मा या जोडीला घेऊन इम्तियाज अली प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’मधील जोडी सध्या इम्तियाजच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पंजाबमध्ये पोहोचली आहे. शाहरुख आणि अनुष्काच्या तिसऱ्या चित्रपटाच्या नावाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे शाहरुख आणि अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंजाबमध्ये चित्रीकरणासाठी गेलेल्या जोडीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्का पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये देशी अवतारात दिसते. तर शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.

इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांच्या चित्रपटाबद्दल अनेक चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाच्या शीर्षकापासून ते चित्रटातील शाहरुखच्या भूमिकेबद्दल अनेक चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी ‘रहनुमा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वी शाहरुख-अनुष्का यांचा आगामी चित्रपट ‘द रिंग’ या नावाने प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, दोन्ही नावासंदर्भात अद्यापही चित्रपटाच्या टीमकडून दुजोरा मिळालेला नाही.

शाहरुख-अनुष्काच्या आगामी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ आणि शाहरुख-अनुष्काचा ‘रेहनुमा’ ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक कोणाला पसंती देणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

अनुष्का आणि शाहरुख यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटानंतर इम्तियाजच्या चित्रपटातून ही जोडी तिसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या तीन चित्रपटातील मुख्य भूमिकेशिवाय २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये दिल है मुश्किल’ या अनुष्काच्या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:45 pm

Web Title: shah rukh khan anushka sharma shoot imtiaz ali film in punjab see viral photos
Next Stories
1 सगळ्या वादातून दूर जात कपिलनं धरली ‘वन’वाट
2 PHOTOS: मिशासह शाहिद-मीराचे आउटिंग
3 अमिताभ यांच्या हस्ते होणार सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाचे अनावरण?
Just Now!
X