News Flash

Aamir Khan’s Diwali bash PHOTOS : आमिर खानची ग्रॅण्ड दिवाळी पार्टी

दीपिकाने यावेळी एम्ब्रॉयडरी असलेली सुंदर साडी नेसली होती.

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसाठी दमदार पार्टी आयोजित केली होती.

दिवाळी आनंद घेऊन येते.. दिवाळी प्रकाश घेऊन येते.. आणि दिवाळी सुख-समृद्धी घेऊन येते.. हे वर्ष समृद्धीचे, भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करून यंदाही दिव्यांच्या रोषणाईत आणि खूप साऱ्या शुभेच्छांसह दिवाळसणाला सुरुवात झाली. या सणाचे औचित्य साधत एकता कपूर, सलमान खान, संजय दत्त, रमेश तौरानी या सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर आता दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसाठी दमदार पार्टी आयोजित केली होती.


आमिरने पत्नी किरण राव आणि त्याचा पाच वर्षांचा मुलगा आझाद यांच्यासह छायाचित्रकारांना फोटोसाठी पोज दिली. या पार्टीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण, करण जोहर, सैफ अली खान, करिना कपूर खान, करिष्मा कपूर, सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

सैफ आणि करिनाने त्यांच्या नवाबी ग्लॅमरने आमिरच्या पार्टीत आणखीनच रंगत आणली. करिनाने लेहेंगा, दुपट्टा घातला होता. तर सैफही यावेळी पारंपरिक पोशाखात दिसला. या जोडप्याचा फोटो पाहता त्यांना ‘रॉयल कपल’ म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

‘पद्मावती’ फेम अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याच्यासह पार्टीला हजेरी लावली. दीपिकाने यावेळी एम्ब्रॉयडरी असलेली सुंदर साडी नेसली होती.

शाहरुख खान, गौरी खान आणि आमिर कॅमेऱ्यास पोज देताना.

हिरव्या रंगाच्या निऑन लेहेंगा चोळीतील आलिया भट्टने अभिनेता अर्जुन कपूरसोबत पार्टीला हजेरी लावली.

‘स्टुण्ड ऑफ द इयर’ अभिनेते आणि एकमेकांचे खास मित्र असलेल्या वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पारंपरिक पोशाख केला होता.

‘दंगल’ चित्रपटात आमिरच्या मुलींची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत

अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, परिणीती चोप्रा

सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन

नुकतेच आई-बाबा झालेले सोहा अली खान आणि कुणाल खेमू

बॉनी कपूर आणि श्रीदेवी हे जान्हवी, खुशी या त्यांच्या मुलींसह आले होते.

साक्षी तन्वर

रणबीर कपूर

मान्यता, आमिर आणि संजय दत्त

अनिल अंबानी, किरण राव आणि निता अंबानी

स्वरा भास्कर आणि सोनाक्षी सिन्हा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 3:23 pm

Web Title: shah rukh khan kareena kapoor deepika padukone and others turn up for aamir khans diwali bash
Next Stories
1 कमाल आर खान ट्विटरविरोधात कोर्टात जाणार
2 गेल्या २४ वर्षांत दिवाळीत कधीही फ्लॉप झाला नाही शाहरुख खान
3 PHOTOS : सनी देओलच्या पत्नीचे फोटो पाहिलात का?
Just Now!
X