22 January 2021

News Flash

शाहरुखने घेतली आमिरची बाजू, ‘ठग्स ऑफ…’च्या अपयशाबद्दल म्हणाला…

बिग बजेट, तगडी स्टारकास्ट असतानाही हा चित्रपट प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्याही अजिबात पसंतीस उतरला नाही.

दिवाळीच्या मुहूर्तावर आमिर खान- अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला. बिग बजेट, तगडी स्टारकास्ट असतानाही हा चित्रपट प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्याही अजिबात पसंतीस उतरला नाही. या चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया सर्वाधिक मिळाल्या. पहिल्यादिवशी विक्रम मोडणाऱ्या चित्रपटाच्या कमाईची गाडी नंतर पूर्णपणे मंदावली. हा चित्रपट सोशल मीडियावरही खिल्लीचा विषय ठरला.

मात्र बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरला आहे. ‘ठग्स’ला जरा जास्तच नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या गेल्या. पण ठग्सला नाव ठेवण्याआधी त्यामागच्या मेहनतीचाही विचार प्रेक्षकांनी केला पाहिजे. आमिर खान यांनी आपले १००% या चित्रपटासाठी दिले. बिग बींगनी देखील चित्रपटासाठी आमिरइतकीच मेहनत घेतली. या दोघांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करू शकला नाही म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही.

चित्रपटाला दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे कदाचित त्यांना वाईट वाटलं असेल पण ते नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा दमदार चित्रपट पुन्हा घेऊन येतील असा विश्वास शाहरुखनं व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 6:11 pm

Web Title: shah rukh khan on thugs of hindostan debacle
Next Stories
1 लग्नाआधी मी ७५ मुलींना डेट केलंय- अंगद
2 टी-सिरीजचा विक्रम! ठरला जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा यूट्युब चॅनेल
3 ‘बधाई हो’ पाहिल्यानंतर बिग बींने लिहिले नीना गुप्ता यांना पत्र
Just Now!
X