News Flash

शाहरुख खान चौथ्या अपत्याचे नाव ठेवणार आकांक्षा

खुद्द शाहरुख खाननेच याचा उलगडा केला आहे.

शाहरुख खान, आर्यन, सुहाना, अब्राम

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानप्रमाणेच त्याची तिनही मुलं आर्यन, सुहाना आणि अब्राम हीसुद्धा माध्यमांमध्ये तितकीच प्रसिद्ध आहे. अब्रामचा तर एक वेगळा चाहता वर्गही तयार झाला आहे. या तिघांमध्ये कदाचित चौथ्या मुलाचीही लवकरच भर पडू शकते आणि असे आम्ही नाही तर खुद्द शाहरुखचेच म्हणणे आहे. त्याने असं म्हणण्यामागचा किस्साही तितकाच रंजक आहे.

वाचा : पुरुषांचा स्टॅमिना वाढवणारा व्हायग्रा टॅक्स फ्री पण..

सध्या शाहरुख आनंद एल राय यांच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याचसोबत तो स्टार प्लस वाहिनीवरील ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ शोचे सुत्रसंचालनही करतोय. नुकत्याच या शोच्या एका एपिसोडमध्ये शाहरुखने चौथ्या अपत्याची इच्छा व्यक्त करत तिचे नाव आकांक्षा असे ठेवणार असा उलगडा केला.

खरंतर झालं असं की, शोच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखला आकांक्षा या शब्दाचा उच्चार करण्यास सांगण्यात आले. पण, रुपेरी पडद्यावर कोणतीही भूमिका अगदी सहज साकारणाऱ्या या अभिनेत्याला हा शब्द उच्चारण्यासाठी अनेक रिटेक्स घ्यावे लागले. याविषयी शाहरुख म्हणाला की, मी अनेकदा अडखळत होतो आणि हे खरंच खूप वाईट आहे. कारण माझ्यासोबत असं कधी घडत नाही. मला वाटतं लवकरच मला चौथ्या अपत्याचा विचार करावा लागेल आणि तिचे नाव मी आकांक्षा ठेवेन.

वाचा : …म्हणून ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मध्ये सर्वात छोटी भूमिका कतरिनाच्या वाट्याला

दरम्यान, लवकरच शाहरुख ‘झिरो’ चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यात तो बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारेल. २१ डिसेंबर २०१८ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका आहेत. सध्या शाहरुख केवळ याच चित्रपटावर लक्ष केंद्रित करत असून, दुसरा कोणताही चित्रपट त्याने हाती न घेतल्याचेही शाहरुखने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 12:10 pm

Web Title: shah rukh khan reveals that he is going to have a 4th child and name her akanksha
Next Stories
1 भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे समग्र साहित्य लवकरच
2 …म्हणून ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मध्ये सर्वात छोटी भूमिका कतरिनाच्या वाट्याला
3 नाटय़ परिषद पंचवार्षिक निवडणूक : मोहन जोशी यांचा अर्ज बाद
Just Now!
X