News Flash

पाहा शाहरुख आपल्या मुलांबाबत काय म्हणाला…

आर्यनला त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणं फारसं आवडत नाही

बॉलिवूडचा बादशहा आपल्या तीनही मुलांवर एकसारखे प्रेम करतो. शाहरुखमुळेच त्याची मुले कायम प्रसारमाध्यमांच्या नजरेत असतात. त्यातही सध्या किंग खानचा लहान मुलगा अब्राम आणि मुलगी सुहाना यांच्याबाबतीत अनेक बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात. शाहरुख आपल्या लहान मुलाचे अब्रामचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. पण त्याचा मोठा मुलगा आर्यनला त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणं फारसं आवडत नाही. पण तरीही आज शाहरुखने आपल्या तीनही मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्याने अनोखे कॅप्शन दिले आहे.

नुकताच शाहरुखने अलिबागच्या फार्महाऊसवर ५२ वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत मुंबईतून अलिबागला जातानाचे सुहाना आणि तिच्या मैत्रिणींचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. अब्रामला प्रसारमाध्यमांकडून मिळणारे प्रेम फार आवडते. त्याउलट आर्यन मात्र नेहमीच या साऱ्यापासून लांब राहिला.

शाहरुखच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो आनंद एल राय यांच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो एका ठेंगण्या माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 6:12 pm

Web Title: shah rukh khan shares a picture of his three vices
Next Stories
1 नवाजुद्दीनने २४ तासांत माफी मागावी; सुनीताने पाठवली नोटीस
2 PHOTO : ‘झलकारी बाई’चा फर्स्ट लूक होतोय व्हायरल
3 मी चुकले; ‘त्या’ व्हायरल फोटोंवर माहिराची माफी
Just Now!
X