News Flash

कपिल शर्माच्या नव्या कार्यक्रमाच्या प्रोमोची शाहरूखसोबतची छायाचित्रे व्हायरल

पूर्वीही शाहरूख खानने 'कॉमेडी नाईटस विथ कपिल'च्या सेटवर अनेकदा हजेरी लावली होती.

The Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावरील सोनी वाहिनीवर २३ एप्रिलपासून 'द कपिल शर्मा शो' सुरू होत आहे.

बॉलीवूडचा किंग शाहरूख खान याने नुकतेच कपिल शर्मा याच्या नव्या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी चित्रीकरण केले. छोट्या पडद्यावरील सोनी वाहिनीवर २३ एप्रिलपासून ‘द कपिल शर्मा शो’ सुरू होत आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून नुकताच त्याचा प्रोमो शुट करण्यात आला. या शुटिंगदरम्यानची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. यापैकी एका छायाचित्रात शाहरूख खान मॉनिटरवर चित्रित केले दृश्य बघत असून कपिल शर्मा त्याच्यापाठी कॉफीचा मग धरून उभा असलेला दिसत आहे. यापूर्वीही शाहरूख खानने ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’च्या सेटवर अनेकदा हजेरी लावली होती. यानंतर शाहरूख खान आणि कपिल शर्मा यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे आता नव्या कार्यक्रमाचा शुभारंभालाही कपिलने शाहरूखलाच निमंत्रण दिले आहे.
कपिल शर्माला त्याच्या नव्या शोमध्ये नरेंद्र मोदींना आणायचंय! 

shahrukhakhan
नव्या शोमध्ये कपिलबरोबर त्याची पूर्ण टीम सुनील ग्रोव्हर, अली असगर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि नवज्योत सिंग सिद्धू हे नव्या जोमाने दिसणार आहे. नव्या शोचे निश्चित स्वरूप त्याने उलगडून सांगितले नसले तरी पहिले काही भाग हा शो देशातील विविध भागांत नेण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. सुरुवात दिल्लीतून करण्यात येणार आहे.
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’चा शेवटचा भाग प्रसारितच न झाल्याने हळहळ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 11:34 am

Web Title: shah rukh khan shoots for the kapil sharma show promo see pics
Next Stories
1 ‘सरफरोश’चा सिक्वेल येणार
2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बॉलीवूडचे वर्चस्व
3 अरबाज आणि मलायकाचा अखेर काडीमोड
Just Now!
X