News Flash

नवरा माझा गुणाचा!, पत्नी मीराकडून शाहिदला शाब्बासकी

सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या ‘ सेंटर ऑफ ग्रेविटी’ चॅलेंज धुमाकुळ घालताना दिसतंय. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज पूर्ण केलंय. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांची. मीराने नुकताच शाहिदसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिलीय.

मीराने शाहिदसबोत ‘ सेंटर ऑफ ग्रेविटी’ चॅलेंज पूर्ण करतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. तर हे चॅलेंज पूर्ण केल्याबद्दल तिने शाहिदचं कौतुकही केलंय. ” चॅलेंज स्विकारण्यासाठी कायम तयार. मिस्टर कपूर तूम्हाला हे खूप सहज जमलंय..कमाल” असं कॅप्शन मीराने या व्हिडीओला दिलंय. मीराच्या या व्हिडीओला शाहिदचा भाऊ इशान खट्टर याने कमेंट केलीय. “मी पण हे केलंय.” असं म्हणत त्याने हार्टचे इमोजी कमेंटमध्ये दिले आहेत. तर अनेक चाहत्यांनी शाहिद मीराचा हा व्हिडीओ पसंत केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मीरा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करते असते. तसचं शाहिद आणि मीरा सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या चॅलेंजमध्ये भाग घेताना दिसतात.

शाहिद कपूर सध्या डीके आणि राज यांच्या एका बिग बजेट वेब सिरीजच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. त्याचसोबत ‘कबीर सिंह’ सिनेमाचे निर्माता अश्विन वर्दे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमात शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 10:42 am

Web Title: shahid kapoor and wife meera kapoor share video center of gravity challenge viral on social media kpw 89
Next Stories
1 रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज
2 कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या स्वयंपाक घरातून माकडाने केली चोरी, व्हिडीओ व्हायरल
3 बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाच्या बर्थडे पार्टीला श्रद्धा कपूरने लावली हजेरी
Just Now!
X