बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान बऱ्यात काळापासून पडद्यापासून लांब आहे. त्याचे चाहते बऱ्याच काळापासून शाहरुखच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. या दरम्यान, चित्रपट निर्माता करण जोहरने शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करणने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहरूख त्याच्या बाल्कनीत उभा असून घराबाहेर असलेल्या चाहत्यांना पाहत अभिनेता राजेश जैसला बोलतो, ‘बघा, इतके चाहते कोणाच्या घराबाहेर येतात?’ राजेश म्हणतो, ‘नाही सर, अजून पाहिले नाही पण पुढे काही सांगू शकत नाही. कारण डिज्झनी प्सल हॉटस्टारवर इतर कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होत आहे.’ शाहरुख खान म्हणतो, ‘ठीक आहे, बाकी सगळे कोण.’ राजेश म्हणतो, ‘अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि संजय दत्त.’ शाहरुख खान म्हणतो, ‘सगळे आहेत का?’ राजेश म्हणतो, ‘सगळे नाही’ तर, शाहरुख म्हणतो, ‘कोण नाही.’ राजेश म्हणतो, ‘सर, तुम्ही तिथे नाही.’

आणखी वाचा : गणेशोत्सवात अबरामचा गणपती बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे शाहरूख झाला होता ट्रोल

शाहरुखचा हा व्हिडीओ शेअर करत ‘मी कधीही विचार केला नव्हता की मी तो दिवस बघेन जेव्हा बॉलिवूडच्या किंग खानलाही FOMO म्हणजे लोक त्याला विसरती याची भीती वाटेल. आता मी सगळं काही पाहिलं आहे,’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. करणने शेअर केलेला हा व्हिडीओ रिट्वीट करत शाहरूख म्हणाला, ‘पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त.’

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

दरम्या, शाहरूख दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख सध्या ‘पठाण’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात पहिल्यांदा शाहरुख आणि जॉनला एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे.