अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासामध्ये बॉलिवूड ड्रग्स रॅकेट हा नवा मुद्दा समोर आला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नाव उघड झाली आहेत. त्यामुळेत सध्या एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र त्यामुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास मागे पडला आहे, असं अभिनेता शेखर सुमन यांनी म्हटलं आहे. शेखर सुमन यांनी ट्विट करुन मत मांडलं आहे.

“ड्रग्सिस्टला मारा, त्यांना तुरुंगात डांबा, देशातून हकलून द्या, चित्रपटांमधून बाहेर काढा. काहीही करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. आम्हाला फक्त इतकंच सांगा सुशांतची हत्या कोणी केली आणि का केली?. कुठे गेले पिठानी, नीरज, सॅम्युअल,खत्री,कुक,लॉकस्मिथ, रुग्णवाहिका चालक, चेहरा झाकलेली ती मुलगी आणि समूचा गॅग”, असं ट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह,करिश्मा प्रकाश, सारा अली खान या अभिनेत्रींची नाव समोर आली आहेत. त्यामुळे त्यांना एनसीबीने समन्स बजावले आहेत. यामध्ये शुक्रवारी रकुल प्रीत सिंह आणि करिश्मा प्रकाश यांची चौकशी होणार आहे. तर २६ सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोणची चौकशी करण्यात येणार आहे.