अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया दिली. ड्रग्जचा विषय सोडा आणि सुशांतसोबत काय घडलं होतं ते आम्हाला सांगा, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

“ड्रग्ज घेणाऱ्यांना मरु द्या.. त्यांना तुरुंगात टाका.. त्यांना देशातून बाहेर काढा.. त्यांना चित्रपटातून बाहेर काढा.. आम्हाचं या प्रकरणाशी काही देणघेणं नाही. फक्त सुशांतसोबत काय घडलं होतं ते सांगा? सुशांतची हत्या कोणी आणि का केली? कुठे गेले पिठाणी, नीरज, सॅम्युअल, कूक, रुग्णवाहिकेचा चालक, नकाब वाली तरुणी? कुठे गेली ही गँग काही तरी सांगा?” अशा आशयाचं ट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेखर सुमन सुशांत मृत्यू प्रकरणावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य ड्रग्जमध्ये”; अभिनेत्याने उडवली दीपिकाची खिल्ली

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.