News Flash

शेजारच्या व्यक्तीला करोना झाल्याचे कळताच अशी होती शिल्पाच्या नवऱ्याची प्रतिक्रिया

पाहा मजेशीर व्हिडीओ

लॉकडाउनमुळे सध्या सर्वचजण घरात अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. काही जण सामाजिक विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात तर काही जण टिक-टॉकवर व्हिडीओ तयार करुन वेळ घालवत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील मागे नाही. ती दररोज नवनवीन टिक-टॉक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत देखील असतात. पण काही दिवसांपूर्वी शिल्पाने पतीला शेजारच्या व्यक्तीला करोना झाल्याचे सांगतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू येईल.

शिल्पा अनेकदा तिचे टिक-टॉक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. तसेच तिच्या बऱ्याच व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा देखील असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी शिल्पाने केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती पती राज कुंद्राला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला करोना झाल्याचे सांगताना दिसत आहे. ते ऐकून राजची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून एका टीव्ही आणि बॉलिवूड स्टार इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे.

‘सुनो, तुम्हें पता है हमारी पड़ोसन को कोरोना हो गया है’ असे शिल्पा शेट्टी व्हिडीओमध्ये बोलताच राज पळत जातो आणि हात धूवू लागतो. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यापूर्वी शिल्पाचा पती राज कुंद्रासोबतचा टिक-टॉक व्हिडीओ चर्चेत होता. त्या व्हिडीओमध्ये शिल्पा मराठी चित्रपट ‘धूरळा’ मधील अभिनेत्री ताम्हणकरचा लोकप्रिय डायलॉग थोड्या वेगळ्या अंदाजात राजला ऐकवताना दिसते. तिचा हा अंदाज देखील खळखळून हसवणारा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 6:47 pm

Web Title: shilpa shetty husband raj kundra funny tik tok video on coronavirus avb 95
Next Stories
1 लॉकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या अभिनेत्रीला तब्बल दोन वर्षांनंतर आईने केला फोन
2 करोना व्हायरसशी संबंधीत आहे केबीसी रेजिस्ट्रेशनचा पहिला प्रश्न
3 mothers day 2020 : खास फोटो शेअर करत हेमामालिनींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
Just Now!
X