आगामी ‘ढिश्क्याव’ चित्रपटात शिल्पा शेट्टी शिकागो ट्रूप डान्सर्ससोबत आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात हरमन बवेजाही शिल्पासोबत नृत्य करताना दिसेल.
‘तू मेरे टाइप का नहीं है’ असे गाण्याचे बोल असून, या आयटम नंबरसाठी शिकागोच्या प्रसिद्ध ट्रूप डान्सचा नृत्य प्रकार निवडण्यात आला आहे. इतकेच नाही तर या आयटम नंबरसाठी ट्रूप डान्सर्सना भारतात बोलविण्यात आले आहे. शिल्पा शेट्टी, हरमन बवेजा आणि ट्रूप डान्सर्स अशी तिगडी या आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 12:26 pm