News Flash

दीपिका कक्करच्या प्रेग्नसीवर पती शोएब इब्राहिमने केला मोठा खुलासा

दीपिका आणि शोएबच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून ते आई-बाबा होणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या आहेत.

(Photo-Indian Express)

अभिनत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम टेलिव्हजनवरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दीपिका आणि शोएब हे सोशल मीडीयावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. दैनंदिन आयुष्य असो किंवा एखादा खास क्षण अनेक घडामोडी ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचे लाखो चाहते आहेत. शोएब एक उत्तम पती असून तो दीपिकाची काळजी घेत तिला कायम फुलासारखं जपताना दिसतो.

मात्र गेल्या काही दिवसांपासून दीपिका लवकरच आई होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दीपिका आणि शोएबच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून ते आई-बाबा होणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. या चर्चांमुळे खरंतर दीपिका आणि शोएबचे चाहते प्रचंड आनंदान आहेत. अनेक जण दीपिका आणि शोएबवर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आहेत. तर काहीजण फोन आणि मेसेज करून त्यांना ही बातमी खरी आहे का असे प्रश्न विचारू लागेले आहेत. चाहत्यांच्या या प्रश्नावर दीपिका आणि शोएबने अखेर मौन सोडलंय. शोएबने एक सरप्राइज लाइव्ह सेशन करत मोठा खुलासा केलाय.

या लाइव्ह सेशनमध्ये शोएब त्याला अनेक जण दीपिका प्रेग्नट आहे का? हे खरं आहे का? असे सवाल विचारत असल्याचं म्हणाला.

हे देखील वाचा: ४० वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर नीना गुप्ता यांना बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली !

या व्हिडीओत शोएब म्हणाला, “मी बाबा होणार आणि दीपिका आई होणार ही बातमी खोटी आहे. या अफवा आहेत. असं काही असतं तर आम्ही तुम्हाला सांगितलं असतं. मात्र ही बातमी खोटी काही तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका.” असं म्हणत शोएब आणि दीपिकाने चाहत्यांशी संवाद साधला.

‘ससुराल सिमरका’ या मालिकेच्या सेटवर दीपिका आणि शोएबमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरू लागलं. २०१८ सालामध्ये शोएब आणि दीपिका लग्न बंधनात अडकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 3:30 pm

Web Title: shoaib ibrahim and deepika kakar reacts to pregnancys news aad 97
Next Stories
1 मीरा राजपूतने दीरासोबतचा क्यूट फोटो केला शेअर; ईशान खट्टर म्हणाला, ‘भाभी डॉल’
2 ‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, नीना गुप्तांनी मुलीला दिला होता सल्ला
3 ४० वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर नीना गुप्ता यांना बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली !
Just Now!
X