News Flash

शोलेतला ‘सुरमाँ भोपाली’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन

शोले या चित्रपटातील साकारलेली सुरमाँ भोपाली ही भूमिका फार गाजली होती

बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता. त्यांची शोले या चित्रपटातील सुरमाँ भोपाली  साकारलेली ही भूमिका फार गाजली होती.

जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली. अब दिल्ली दूर नही, मुन्ना, हम पंछी डाल के हे बालकलाकार म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटही गाजले होते. त्यानंतर त्यांनी बिमल रॉय यांच्या चित्रपटापासून विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्षे ते बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. तसंच त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

शोले चित्रपटातील त्यांची सुरमा भोपालीची भूमिका फार गाजली. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमाँ भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते. जगदीप यांनी अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह अशा चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघं आपल्या नृत्य कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 11:12 pm

Web Title: sholay bollywood senior actor jagdip passes away at age of 81 jud 87
Next Stories
1 तुफान व्हायरल होणारं ‘हे’ भोजपुरी गाणं तुम्ही पाहिलंय का?
2 “तू आत्महत्या का करत नाहीस?”; नेटकऱ्याच्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली…
3 “तुझ्या वडिलांना हे प्रश्नसुद्धा विचार “; पूजा भट्टला कंगनाचं सडेतोड उत्तर
Just Now!
X