27 January 2021

News Flash

श्रुती हासन-विद्युत जामवाल एकत्र; ‘द पॉवर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

द पॉवर 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

दाक्षिणात्य कलाविश्वतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर श्रुतीने अनेकांच्या मनावर राज्य केलं. तर आपल्या अॅक्शन सीनमुळे अनेकांच्या नजरा वेधून घेणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. अॅक्शन सीन, स्टंट यामुळे विद्युत कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे बॉलिवूड आणि टॉलिवूड अशा दोन्ही क्षेत्रातील हे दिग्गज कलाकार लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

श्रुती आणि विद्युत द पॉवर या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट थ्रिलर असून यात एका जोडप्याची कथा सांगण्यात येणार आहे. कौंटुंबिक कलहामुळे या दोघांच्या नात्यात येणारे चढउतार, त्यांचा प्रवास या सगळ्यावर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून झी एन्टरटेन्मेंटच्या पे-व्ह्यू-प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित होणार आहे. विद्युत जामवाल आणि श्रुती हासन हे कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अलिकडेच विद्युतचा ‘खुदा हाफिज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची विशेष प्रशंसा करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 4:39 pm

Web Title: shruti haasan and vidyut jammwal new movie the power coming soon ssj 93
Next Stories
1 नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या नात्यात फूट; अभिनेत्री करतेय ‘यश’ला डेट?
2 कमबॅक! रेमोने शेअर केला वर्कआऊटचा व्हिडीओ
3 चाहत्याची सत्वपरीक्षा; महिन्याभरापासून चाहता ‘मन्नत’बाहेर उभा, कारण वाचून व्हाल थक्क
Just Now!
X