अभिनेत्री श्वेता तिवारी लवकरच ‘खतरों के खिलाडी-११’ मध्ये झळकणार आहे. केपटाऊनमध्ये या शोचं शूटिंग सुरु असताना श्वेताने अभिनेता अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्यसोबत चांगलीच धमाल केली आहे. श्वेताचे अर्जुन आणि विशालसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.

नुकतीच ‘खतरों के खिलाडी’ची टीम राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या रिसेप्शन पार्टीत धमाल करताना दिसली. या पार्टीतील श्वेता, अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्यच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्वेता तिवारी अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्यसोबत धमाल डान्स करताना दिसतेय. ‘आफरीन आफरीन’ गाण्यावर ते डान्सची मजा लुटत आहेत. यावेळी अर्जुन आणि विशालची श्वेतासोबत नाचण्यासाठी स्पर्धा सुरु असल्याचं दिसतंय. तसचं दोघही श्वेतासोबत फ्लर्ट करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा: “मग जरा पेट्रोलच्या दरावर लिहा”; ‘त्या’ ट्वीटनंतर बिग बी अमिताभ बच्चन ट्रोल

या व्हिडीओत श्वेताने निळ्या रंगाची साडी परिधान केल्याचं दिसतं आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमारने १६ जुलैला लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांच्या रिसेप्शन पार्टीत ‘खतरों के खिलाडी’मधील अनुषा सेन, सना मकबुल, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, विशाल आदित्य, अली गोनी या स्पर्धंकांनी हजेरी लावत धमाल केली.

दरम्यान श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कामयच चर्चेत आली आली आहे. श्वेताचा पती अभिनवने श्वेतावर सतत वेगवेगळे आरोप केले आहेत. तर श्वेताने देखील हे आरोप खोटे असल्याचं म्हणत कायम आपली बाजू मांडली आहे.