News Flash

सलमानचा बॉडीगार्ड म्हणतो, ‘हा’ ठरणार बिग बॉस १३ चा विजेता

शेरा हा सलमान खानचा बॉडीगार्ड असून त्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक मानला जातो

‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर चांगलाच लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही या शोला विशेष पसंती मिळत असते. वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. लवकरच ‘बिग बॉस १३’चा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. त्यामुळे यंदा ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. त्यातच कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने यंदा कोणता स्पर्धक जिंकणार हे सांगितलं.

शेराने एका मुलाखतीमध्ये बोलत असताना यंदाचा ‘बिग बॉस १३’चा विजेता कोण होणार हे सांगितलं. शेरा हा सलमान खानचा बॉडीगार्ड असून त्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक मानला जातो. त्यामुळे शेराने बिग बॉस १३विषयी वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.
लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला यंदाच्या पर्वाचा विजेता होईल असं शेराने सांगितलं आहे. सिद्धार्थ हा शेराचा आवडता स्पर्धक आहे. त्यामुळे तो जिंकावा अशी इच्छा शेराची आहे. तसंच तो जिंकेल असा विश्वासही त्याला आहे.

“सिद्धार्थ शुक्ला माझा आवडता स्पर्धक आहे. केवळ माझाचा नाही तर मी कोणत्याही महिलेला किंवा तरुणीला बिग बॉसच्या घरातला आवडता स्पर्धक कोण असा प्रश्न विचारला तर त्यादेखील सिद्धार्थचं नाव घेतील. सिद्धार्थचा पराभव करणं वाटतं तितकं सोपं नाहीये”, असं शेरा म्हणाला.

वाचा : आधुनिक विचारांच्या कल्कीने मुलीचं नावं ठेवलं ‘साफो’; जाणून घ्या या नावामागचा इतिहास

दरम्यान यंदाच्या पर्वामध्ये सिद्धार्थ शुक्ला हा लोकप्रिय स्पर्धक मानला जात आहे. त्याला प्रेक्षकांचा तसंच काही छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींचा पाठिंबा आहे. सध्या बिग बॉसच्या घरात केवळ सात सदस्य बाकी आहेत. १४ फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 12:39 pm

Web Title: siddharth shukla will be the winner of bigg boss 13 says salman khan bodyguard shera as per reports ssj 93
Next Stories
1 हैदराबाद पोलिसांचं समर्थन करण्याची वेळ येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती – मकरंद अनासपुरे
2 बराक ओबामा यांच्या डॉक्युमेंट्रीला मिळाला ‘ऑस्कर’
3 आधुनिक विचारांच्या कल्कीने मुलीचं नावं ठेवलं ‘साफो’; जाणून घ्या या नावामागचा इतिहास
Just Now!
X