News Flash

सिद्धार्थने पुन्हा एकदा दाखवून दिले आलिया प्रेम

म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी तिच्यासोबत शेअर करतो.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या बॉलिवूड वर्तुळात सिद्धार्थ आणि आलिया यांच्या प्रेमसंबंधाविषयी चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. नुकतेच सिद्धार्थने दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थचे आलिया प्रेम पुन्हा एकदा दिसून आले. बी टाऊनमधील सर्वाधिक सुरक्षित अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला होता. यावर सिद्धार्थने आलिया भट्टचे नाव सांगितले. मी आलियाला बॉलिवूड पदार्पणाच्या पहिल्या दिवसांपासून ओळखतो. असे सिद्धार्थ म्हणाला. बॉलिवूडमधील अद्भभूत व्यक्तिमत्वापैकी आलिया एक असल्याचे सांगत सिद्धार्थने आलियाचे कौतुक केले. आलिया समविचारी असल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी तिच्यासोबत शेअर करतो, असे सिद्धार्थ म्हणाला. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘स्टूडण्ट ऑफ द इयर’ आणि ‘कपूर अॅण्ड सन्स’ या दोन चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली होती.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा बर्थडे आज असला तरी काल रात्री बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थडे निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये आलिया भट्ट, कतरिना कैफ, परिणीती चोप्रा आणि ट्विकंल खन्ना या अभिनेत्रींसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आलिया आणि सिद्धार्थ यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा ‘आशिकी ३’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.‘डिअर जिंदगी’मधील आपल्या अभिनयाने प्रशंसेस पात्र ठरलेली आलिया ‘आशिकी ३’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आलिया आणि सिद्धार्थ हे पडद्या बाहेरचे प्रेमी जोडपे पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र आले तर ‘आशिकी ३’ची लोकप्रियता आणखीनच वाढेल, अशी आशा चित्रपट निर्मात्यांना आहे. ‘आशिकी २’ या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. यामध्ये श्रद्धा कपूरने गायलेल्या गाण्यालाही दाद मिळाली होती. चित्रपटातील कथानकाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक कलाकार गाताना दिसत आहेत.

आलियाच्या यशाबाबत बोलायचे तर ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टला ‘उडता पंजाब’ या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर महेश भट्ट यांनी चेहऱ्यावर स्मित असलेल्या, शांतपणे झोपी गेलेल्या आलियाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 8:37 pm

Web Title: sidharth malhotra protective alia bhat
Next Stories
1 हॉलिवूड गर्ल दीपिकाला सोनम कपूर ओळखत नाही
2 अमिताभ-दिशाने केला संजूबाबा-क्रितीचा पत्ता कट
3 Zaira Wasim: ‘त्या’ माफीनाम्यासंदर्भात नेटिझन्सनी दिला झायराला पाठिंबा
Just Now!
X