गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. दरम्यान कियाराने तिच्या वाढदिवशी बॉलिवूडमधल्या मित्रमंडळींसाठी आयोजीत केलेल्या खास पार्टीमध्ये सिद्धार्थ आणि कियारा एकत्र पाहायला मिळाले. तेव्हा पासून त्यांच्या नात्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. परंतु एका शोमध्ये सिद्धार्थने त्याला कोणत्या अभिनेत्रीसह नात्यात आडकायला आवडले याचा खुलासा केला आहे.

सिद्धार्थने आता पर्यंत त्याच्या नात्याच्या चर्चांवर बोलणे टाळले आहे. परंतु एका शोदरम्यान सिद्धार्थला बॉलिवूडमधल्या कोणत्या अभिनेत्रीसह लग्न बंधनात आडकायला आवडेल, बॉलिवूडमध्ये कोणाला मारायला आवडेल आणि कोणासोबत नात्यात आडकायला आवडेल असे प्रश्न विचारले होते. ‘माझा कोणाला मारण्याचा आणि कोणासोबत लग्न करण्याचा विचार नाही. मला कियारा आडवाणी, जॅकलिन फर्नांडिस आणि तारा सुतारियाला डेट करायला आवडेल. जर अभिनेत्यांपैकी म्हणाल तर वरुण धवन, रणवीर सिंग आणि आदित्य रॉय कपूर’ असे उत्तर सिद्धार्थने दिले.

दरम्यान सिद्धार्थाला जर त्याने डेटिंक अॅप डाऊनलोड केले तर स्वत:च्या बायोमध्ये काय लिहिणार असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यावर त्याने ‘सुंदर सुशील आणि रिस्की (धोकादायक)’ असे लिहिणार असल्याचे म्हटले आहे.

सध्या सिद्धार्थ त्याचा आगामी चित्रपट ‘जबरियाँ जो़डी’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सिद्धार्थसह अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सिद्धार्थच्या भूमिकेचे नाव अभय तर परिणीतीच्या भूमिकेचे नाव बबली असे आहे. प्रशांत सिंद दिग्दर्शत ‘जबरियाँ जोडी’ या चित्रपटाचे बालाजी टेलिफिल्म्स आणि कर्मा मिडिया एंटरटेन्मेंट सह- प्रस्तुतकर्ते आहे. याआधी २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हसी तो फंसी’ या चित्रपटात सिद्धार्थ- परिणीतीने एकत्र काम केले होते. ही जोडी तेव्हाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हा आणखी एक अनोखी कथा घेऊन पुन्हा एकत्र येणाऱ्या या जोडीचा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.