News Flash

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकून चाहती कोमात; डॉक्टरांनी ट्वीट करत दिली ‘ही’ माहिती

सिद्धार्थ शुक्लाच्या फॅन असलेल्या एका तरूणीची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येतेय. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरूणीचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

sidharth-shuklas-fan-in-partial-coma-viral-photo

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. एकीकडे त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि शेहनाज गिल बेशुद्धावस्थेत आहेत, दुसरीकडे सिद्धार्थ शुक्लाच्या फॅन असलेल्या एका तरूणीची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येतेय. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झाल्याच्या बातमीने तिला मोठा धक्का बसला आणि हा धक्का तिला सहन न झाल्यानं ही तरूणी कोमात गेल्याची घटना घडलीय.

एक डॉक्टरने ट्विट शेअर करत ही माहिती दिलीय. या ट्विटसोबत प्रकृती बिघडलेल्या तरूणीचा एक फोटो देखील जोडलाय. सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं म्हणून ओक्साबोक्शी रडताना या तरूणीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. ही तरूणी तिच्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. ही तरूणी काही अंशी कोमात गेल्याची माहिती समोर येतेय. सध्या या तरूणीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या या तरूणीचा फोटो शेअर करत डॉक्टरांनी एक माहिती दिली आहे. या ट्विटच्या माध्यमातून डॉक्टरांनी सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांना एक आवाहन देखील केलंय. यात त्यांनी लिहिलंय, “लवकरात लवकर बरी हो…डॉक्टरांनी सांगितलंय की काही अंशी कोमात आहे. जास्त ताण घेतल्यामुळे तिचे डोळे आणि शरीरातील काही भाग काम करत नाहीत. सर्व फॅन्सना शांत राहण्याचं आवाहन करतो. जास्त विचार नका करू आणि तुम्ही स्वतःला आणखी दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. मला माहितेय हे सोपं नाहीय. पण तुम्हाला सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचं सत्य पचवावं लागणार आहे.”

डॉक्टरांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये सिद्धार्थची चाहती बेशुद्धावस्थेत दिसून येतेय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कविता कौशिक हिने देखील पुढे येत ट्विटच्या माध्यमातून सिद्धार्थच्या चाहत्यांना आवाहन केलंय. यात तिने लिहिलंय, “आयसीयूमध्ये असलेल्या या फॅन्सचा फोटो पाहिला जी कोमात आहे. सिद्धार्थ आणि शेहनाजच्या फॅन्सना माझी नम्र विनंती आहे कृपया स्वतःची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांचा आणि पालकांचा विचार करा. सिद्धार्थला हे पाहून देखील दुःख होत असणार. त्याच्या आनंदासाठी कृपया स्वतःला मजबूत ठेवा आणि या दुःखातून बाहेर येण्यासाठी एकमेकांची मदत करा.”

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने २ सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने फक्त चाहतेच नव्हे तर संपूर्ण बॉलिवड क्षेत्राला मोठा धक्का बसलाय. अनेक सेलिब्रिटी सिद्धार्थ सोबतच्या आठवणी शेअर करताना दिसून येत आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूची चौकशी सध्या सुरू असून त्याच्या आईचा जबाव नोंदवण्यात आलाय. यात सिद्धार्थच्या आईने सांगितलं की, सिद्धार्थ रात्री पर्यंत ठीक होता. जेवण झाल्यानंतर तो झोपायला गेला आणि त्यानंतर सकाळी उठलाच नाही. तो कोणत्याही मानसिक तणावाखाली नव्हता, असं देखील सिद्धार्थच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 1:05 pm

Web Title: sidharth shuklas fan in partial coma after news of actors death prp 93
Next Stories
1 द कपिल शर्मा शो: गोविंदासोबत काम करण्यास कॉमेडियन कृष्णा अभिषेकचा नकार
2 नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
3 माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर यांच्या जबरदस्त डान्सचा जलवा; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X