25 February 2021

News Flash

घर आणि करिअरमध्ये उडाली स्मिताची तारांबळ

पप्पी दे पारूला या गाण्यातून प्रेक्षकांना भावलेली पारू म्हणजेच स्मिता गोंदकर.

घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या आपल्या आयुष्यात घर आणि करिअर यातला ताळमेळ हे एक मोठं आव्हान प्रत्येक स्त्रीच्या नजरेसमोर असतं. सामान्य स्त्रीच्या या कथेला सिनेअभिनेत्रींचाही अपवाद नाही. पप्पी दे पारूला या गाण्यातून प्रेक्षकांना भावलेली पारूही याच चक्रात अडकली आहे. घर आणि करिअर या दोघांमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचीही तारांबळ उडाली आहे. निमित्त आहे मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटाचे. वॉन्टेड – अनवॉन्टेडच्या या जगात घर आणि करिअरचा मेळ साधताना बऱ्याचदा वॉन्टेड अनवॉन्टेड कधी होते, हे आपले आपल्यालाही कळत नाही. असंच काहीसं मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटामध्ये स्मिताचे ही झाले आहे.
मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटात या मिसेसचे मिस्टर अनवॉन्टेड क्राइम पेट्रोल फेम राजेंद्र शिसतकर आहेत. दुहेरी कुटुंबाचे गणित मांडणारी ही कथा प्रकाश गावडे यांनी लिहिली असून दिग्दर्शक दिनेश अनंत आणि प्रकाश गावडे या जोडीने चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. एक ताजातवाना विषय आणि तितकीच ताजी स्मिता गोंदकर आणि राजेंद्र शिसतकर यांची ही ताजी जोडी चित्रपट निर्माते मितांग भूपेंद्र रावल यांनी आपल्यासमोर आणली आहे.
उर्वी एंटरप्रायजेस निर्मित आणि दिनेश अनंत दिग्दर्शित मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाखवलेल्या वॉन्टेड – अनवॉन्टेडच्या युध्दात विजय कोणाचा होतो, हे येत्या २३ सप्टेंबरला कळेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 4:27 pm

Web Title: smitas balancing act work or family
Next Stories
1 हृतिक रोशनचे फेसबुक अकाऊंट हॅक
2 प्रभू देवाच्या ‘तुतक तुतक तुतिया’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित
3 संजूबाबाकडे अद्यापही चित्रपटांचा दुष्काळ?
Just Now!
X