News Flash

‘फोर्स २’साठी सोनाक्षी गाळतेय घाम

'फोर्स २'साठी सोनाक्षी कठोर परिश्रम घेत आहे.

सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘फोर्स २’ आणि ‘अकिरा’ या आपल्या आगामी चित्रपटातून हाणामारीची धडाकेबाज दृश्ये साकारून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्यास सज्ज झाली आहे. मोठ्या पडद्यावरील हाणामारीची दृश्ये आकर्षक करण्यासाठी योग्य शरीरयष्ठी प्राप्त व्हावी, म्हणून सोनाक्षी कठोर परिश्रम घेत असून, व्यायाम करतानाचे छायाचित्र तिने शेअर केले आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखेनुरुप स्वत:च्या शरीरयष्टीत बदल करणाऱ्या सोनाक्षीने मंगळवारी पोस्ट केलेल्या या छायाचित्रासोबत “what day is it? Its #transformationtuesday” असे वाक्य लिहिले आहे.
हाणामारीची दृश्ये आपण योग्यप्रकारे साकारत असल्याचे मतप्रदर्शन करत, जे आपल्याला आवडते तेच करण्याची संधी मिळाली असल्याने आपण आनंदी असल्याची भावना तिने चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना व्यक्त केली. अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स २’ चित्रपटात जॉन अब्राहम आणि ताहिर राज बसिन यांच्यादेखील भूमिका आहेत. सोनाक्षीने निर्भीडपणे चित्रपटातील आव्हानात्मक हाणामारीची दृश्ये लिलया साकारल्याने जॉन अब्राहमने तिचे कौतुक केले. एक छान सहकलाकार असलेली सोनाक्षी स्वभावानेदेखील खूप चांगली आहे. ‘फोर्स २’मध्ये ती उत्तम काम करत असल्याचे तो म्हणाला.

Ay what day is it? Its #transformationtuesday.

A photo posted by Sonakshi Sinha (@aslisona) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2016 7:42 pm

Web Title: sonakshi sinha trains hard for her action packed role in force 2
Next Stories
1 बोल्ड आणि ब्युटीफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी
2 ‘पिंडदान’ विषयी बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींमध्ये उत्सुकता!
3 पाहाः राधिका आपटेच्या ‘फोबिया’चा थरारक ट्रेलर
Just Now!
X