20 October 2019

News Flash

सोनाली बेंद्रे करणार मराठीत पुनर्पदार्पण?

'अनाहत' या मराठी चित्रपटाद्वारे सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे.

‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याने सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. मात्र, हे पुनर्पदार्पण बॉलीवूडमध्ये नसून मराठी चित्रपटसृष्टीत असेल.
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने एकही चित्रपट केलेला नाही. मात्र, अगं बाई अरेच्चा चित्रपटात तिने ‘छम छम करता..’ हे गाणे केलेले. गेले काही दिवस तिच्या पुनर्पदार्पणाची चर्चा होती. त्यानंतर ती नुकतीचं कौल मनाचा या मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताला उपस्थित राहिलेली दिसली. त्यामुळे तिच्या पुनर्पदार्पणाच्या चर्चेला आणखीनचं उधाण आले आहे. आता यात किती तथ्य हे सोनालीचं जाणो. पण जर तिने पुनर्पदार्पण केले तर नक्कीचं तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असेल.

First Published on November 17, 2015 1:01 pm

Web Title: sonali bendre will make a comeback in marathi film industry