News Flash

हॉलिवूड गर्ल दीपिकाला सोनम कपूर ओळखत नाही

सोनमने दीपिकाविषयी फारसे बोलणे टाळले.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो सध्या चांगलाच गाजत आहे. अनेक बी टाऊन सेलिब्रिटींनी आतापर्यंत या कार्यक्रमात हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडच्या गॉसिप गर्ल्स सोनम कपूर आणि करिना कपूर या अभिनेत्रींनी कॉफीच्या बहाण्याने करणसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. या कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणे करणने या दोघींवर कठीण प्रश्नांचा भडीमार केल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्रींनी देखील करणच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. यावेळी करणने सोनम कपूरला दीपिका पदुकोण विषयी विचारले. त्यावर सोनमने प्रामाणिकपणे दीपिकाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. दिपिकाला मी वैयक्तिकरित्या फारशी ओळखत नाही, असे सोनम म्हणाली.

यावेळी सोनमने करणला मागील सत्रातील कार्यक्रमाची आठवण करुन दिली. या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वामध्य दीपिका आणि सोनम एकत्र सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात आम्ही एकत्र आलो होतो एवढीच आमच्यात ओळख आहे. असे सोनम म्हणाली. जर मला कोणी दीपिका आणि प्रियांकामध्ये वरचढ कोण? असे विचारले, तर मी प्रियांकाला पसंती देईल,  हे माझे मत आहे याचा अर्थ दीपिका मला आवडत नाही, असे नाही. हे देखील सोनमने स्पष्ट केले. दीपिकाचा प्रवास यशाच्या पथावर असल्याचेही सोनम यावेळी म्हणाली. तसेच तिच्या सुंदरतेचेही सोनमने कौतुक केले. दरम्यान, मी माझ्या आयुष्यात सुखी असून एखाद्याविषयी मत बनविण्यासाठी मी अधिक वेळ घेत असल्याचे सांगत सोनमने दीपिकाच्या संबंधावर फारसे बोलणे टाळले.

करण जोहरने या कार्यक्रमात करिनाला सध्याच्या घडीला हॉलिवूडसाठी सज्ज असणाऱ्या अभिनेत्रींविषयी प्रश्न विचारले होते. प्रियांका आणि दीपिका पदुकोण यांच्यातील कोणती अभिनेत्री करिनाला अधिक आवडते? हे करणने जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. करणचा प्रश्न संपताच करिनाने दोघीही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे सांगत दोघींना पसंती दिली. त्यानंतर करणने करिनाची फिरकी घेण्यासाठी रणबीर सिंगच्या जुन्या प्रेमप्रकरणांना देखील उजाळा देण्याचा प्रयत्न केला. दीपिका आणि कतरिना यांच्याबद्दल करिनाला त्याने खोचक प्रश्न विचारला. या दोघींसह तू जर एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर तू काय करशील? असे विचारत करणने रणबीर कपूरच्या आयुष्यात आलेल्या प्रेयसींबद्दल करिनाची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. भावाच्या पूर्व नातेसंबंधांवर विचारलेल्या प्रश्नावर करिनाने दिलेले उत्तर हे हैराण करणारे असे होते. कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत जर लिफ्टमध्ये अडकले तर मला आत्महत्या करावी लागेल, असे करिना म्हणाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 7:19 pm

Web Title: sonam kapoor opens about deepika padukone in koffee with karan
Next Stories
1 अमिताभ-दिशाने केला संजूबाबा-क्रितीचा पत्ता कट
2 Zaira Wasim: ‘त्या’ माफीनाम्यासंदर्भात नेटिझन्सनी दिला झायराला पाठिंबा
3 Alia Bhatt : आलिया नाही तर चित्रपट नाही..
Just Now!
X