News Flash

‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर अक्षय पुन्हा एकदा थिरकणार

नव्वदीच्या दशकात या गाण्यानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

मोहरा’ चित्रपटातलं ‘टिप टिप बरसा पानी’ हे आजही ‘एव्हरग्रीन’ गाणं म्हणून ओळखलं जातं. दोन दशकांहून अधिक काळ उलटला तरी या गाण्याची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. नव्वदीच्या दशकात या गाण्यानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. रवीना टंडनने हे गाणं तितक्याच ताकदीनं पडद्यावर उतरवलं होतं. हे गाणं पुन्हा एकदा रिक्रिऐट केलं जाणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या गाण्याचे राइट्स विकत घेतले आहे. आपल्या आगामी सुर्यवंशी या चित्रपटामध्ये हे गाणं चित्रित केलं जाणार आहे.

पुढील आठवड्यांमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये या गाण्याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. खिलाडी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या गाण्यांमध्ये नृत्य करताना दिसणार आहेत. रवीना टंडनने टिप टिप बरसा पानी हे गाण ताकदीनं पडद्यावर उतरवलं होतं. बघणाऱ्यांच्या नजरा गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तिच्यावरच खिळल्या होत्या.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी दे दणा दण या चित्रपटांमधील गले लग जा या गाण्यावर नृत्य केलं होतं. त्यामुळे टिप टिप बरसा पानी हे गाण कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘सूर्यवंशी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहितच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच त्याच्या या चित्रपटामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि कतरिना कैफ तब्बल ९ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 7:02 pm

Web Title: sooryavanshi rohit shetty acquires the rights of the song tip tip barsa paani for the film nck 90
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : घरातील सदस्य देणार पाणी वाचविण्याचा संदेश
2 …म्हणून या सात कलाकारांनी नाकारला होता ‘बॉर्डर’
3 सनी लिओनी शिकतेय खास युपीची हिंदी बोली
Just Now!
X