News Flash

विजयने शेअर केला ‘बीस्ट’मधील फर्स्ट लूक, सोशल मीडियावर चर्चेत

विजयने वाढदिवसाच्या एक दिवस आधी 'बीस्ट'मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नेलसन दिलीप कुमार करणार आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून थलापति विजय ओळला जातो. विजयचा आज २२ जून रोजी वाढदिवस आहे. मात्र, विजयच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच भेट मिळाली आहे. सोमवारी विजयच्या आगामी चित्रपट ‘थलापति ६५’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचं नाव ‘बीस्ट’ असे ठेवण्यात आले आहे. विजयच्या नवीन चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

सोमवारी विजयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘बीस्ट’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये विजयच्या हाथात बंदूक आहे. विजयने यात पांढऱ्या रंगाची बंडी आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. पोस्टरमधील विजयचा लूक हा अप्रतिम आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : ‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

दरम्यान, ‘बीस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नेलसन दिलीप कुमार करणार आहेत. त्यांनी स्वत: चित्रपटाची कथाही लिहिली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे विजयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, या आधी विजयचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘मास्टर’चे चित्रीकरण संपल्यानंतर विजय लगेल ‘बीस्ट’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. सगळ्यात आधी चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण हे जॉर्जियात केले. मात्र, करोना संक्रमणामुळे चित्रीकरण थांबवावे लागले. चित्रपटात पूजा हेगडे व्यतिरिक्त अर्पणा दास, योगी बाबू आणि शाइन टॉम देखील मुख्य भूमिकेत दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 8:35 am

Web Title: south superstar vijay s thalapathy 65 beast movie first look released dcp 98
Next Stories
1 Indian Idol मधून हा स्पर्धक आऊट झाल्यामुळे दुःखी झाली बिग बींची नात नव्या…
2 Video: मुलीने ‘सेक्स’ आणि ‘प्रेग्नंसी’वरून प्रश्न विचारल्यानंतर पिता अनुराग कश्यप म्हणाला…
3 कृतिका गायकवाडचे मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त फोटोशूट!
Just Now!
X