सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने ‘तुला कळणार नाही’ हा भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवरा आणि बायकोच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

लग्नानंतरची प्रेमकथा मांडणारा हा सिनेमा दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलाय. नवरा-बायकोच्या नात्यातील गुजगोष्टी मांडणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर मोशन पोस्टर लाँच करण्यात आला.

वाचा : आतापर्यंत कोणताही सिनेमा तोडू शकला नाही ‘जय संतोषी मां’चा रेकॉर्ड

लग्नानंतरच्या जबाबदा-या, अपेक्षा आणि एकमेकांचे स्वभाव जपत संसाराचा गाडा यशस्वीरित्या पुढे चालवणाऱ्या घराघरातील प्रत्येक नवरा बायकोची कथा यात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा रोमॅण्टिक हिरो स्वप्नील जोशी या सिनेमाद्वारे निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे स्वप्ना वाघमारे – स्वप्नील जोशी अशी दिग्दर्शक-निर्मात्याची केमिस्ट्रीदेखील यात जुळून आली आहे. तसेच श्रेया कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार या तिकडीने देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

वाचा : नीलकांती पाटेकर यांच्या घरी पोहोचला खास पाहुणा

आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती आणि वितरण करणारे जीसिम्ससोबत स्वप्नील जोशी निर्माता म्हणून यापुढील प्रवासात कायम राहणार आहे. तसेच निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. राहुल आणि अंजलीची लग्नानंतरची प्रेमकथा सांगणारा हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.