News Flash

मुंबईकरांना बाल्कनीत रोमान्स करण्यापासून कोण रोखतंय?, सुमीत राघवनने दिलं मजेशीर उत्तर

सुमीतची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

सुमीतची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

अभिनेता सुमीत राघवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुमीत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. एवढंच नाही तर अनेक वेळा तो त्याचं मत मांडताना दिसतो. आता सुमीतने मुंबईकर गॅलरीत रोमान्स का नाही करू शकत याचं कारण सांगितलं आहे.

एका रेल्वे अधिकाऱ्याने एका जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हे जोडप बाल्कनीत एकमेकांकडे बघत असल्याचे त्यात दिसत आहे. ‘नेहमीच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात करण्याआधी, दिवसाची चांगली सुरुवात करण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे?,’ असे त्या फोटोमध्ये लिहिले आहे. त्यावर सुमीतने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘सगळ्यात आधी मुंबईकर बाल्कनीला असं ठेवणार नाही…त्याला बॉक्स ग्रील लावतील..त्यात फुलांची कुंडी ठेवतील, मुलांची सायकल, जुने खोके ठेवतील, कपडे वाळत घालतील, दिवाळीती कंदिल लावतील..या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवत आहेत,’ असे सुमीत म्हणाला. त्याचे हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

सुमीतचे लाखो चाहते आहेत. सुमीतने १० वर्षांचा असताना अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सुमीतने ‘साधाबाई वर्सेस साराबाई’, ‘बडी दुरसे से आऐ है’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सुमीत सध्या ‘वाघले की दुनिया’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 5:36 pm

Web Title: sumeet raghvan speak about what is stoping mumbaikar from doing romance in balcony dcp 98
Next Stories
1 बिग बी आणि कादर खान यांच्या मैत्रीत ‘या’ कारणामुळे पडली होती फूट?
2 राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या रोमॅण्टिक डान्सचा व्हिडीओ व्हायरल; शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले लव्ह बर्ड्स
3 आदित्य देसाई विरूद्ध आदित्य देसाई, ‘माझा होशिल ना’मध्ये नवे वळण
Just Now!
X