29 September 2020

News Flash

सनी लिओनी फेसबुकवर ठरली ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलिवूड’

चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे

पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे ती फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलिवूड’ ठरली आहे. विशेष म्हणजे या लोकप्रियतेच्या यादीमध्ये तिने अनुष्का शर्मालादेखील पिछाडीवर टाकलं आहे.

फेसबुकवर सनीचे २३ मिलिअन फॉलोअर्स असून सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेण्डी लुक्समुळे ती लोकप्रिय ठरली आहे. सनीने दुबई टूरचे फोटो आणि व्हीडीओज, तसेच आपल्या कुटूंबियांसोबतच फोटो, स्टाइलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले आहेत. ते पाहण्यासाठी चाहते तिच्या फेसबुक पेजला भेट देत असतात.यामध्येच तिच्या पोस्टची एंगेजमेंट वाढली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी तिच्या अकाऊंटवर चाहते सर्वाधिक एंगेज असल्याचं दिसून आलं. सनीच्या पाठोपाठ अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. ती ७३.२२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेसबुकवर अनुष्काचे ९.८ मिलिअन फॉलोअर्स आहे. तर फेसुबकवर ४० मिलिअन फॉलोअर्स असलेल्या प्रियंका चोपडाला ६०.७२ गुणांमुळे तिसरे स्थान मिळाले आहे. तसंच फेसबुकवर १४ मिलिअन फॉलोअर्स असलेल्या कतरिना कैफचे वोग मैगजिनसाठी केलेले हॉट फोटोशूट आकर्षण ठरले. आणि त्यामुळेच ५८.४२ गुणांसह ती लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. २३ मिलिअन फोलोअर्स असलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या दबंग टूरच्या अपडेट्समूळे ती मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 3:40 pm

Web Title: sunny leone most engaging actress of bollywood ssj 93
Next Stories
1 नाचता येईना अंगण वाकडे; प्रकाश राज यांचा भाजपाला टोला
2 प्रियांका-निकच्या घरी आला नवा पाहुणा, पाहा व्हिडीओ…
3 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाने घेतलं इतक्या कोटींचं घर; पाहा फोटो
Just Now!
X