क्रिती सनॉन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘राबता’ या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं प्रेमातील विरहाचं प्रभावी चित्रण करत आहे. पण, तरीही अरिजितच्या इतर गाण्यांच्या तुलनेत ‘लंबियां सी जुदाइयां’ तितकंसं प्रभावी वाटत नाही.

गाण्याचे शब्द आणि त्याच्यावर असणारी पंजाबी भाषेची पकड लगेचच जाणवते. मुख्य म्हणजे गाणं सुरु असताना पडद्यावर सुरु असणारी दृश्यं आणि सुशांत- क्रितीची केमिस्ट्री लक्ष वेधत आहेत. क्रिती आणि सुशांतची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि त्यांच्या नात्याविषयी सध्या सुरु असणाऱ्या चर्चा पाहता त्यांचं ऑनस्क्रीन नातंही बरंच काही सांगून जातं.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

दिनेश व्हिजन दिग्दर्शित ‘राबता’ हा चित्रपट ९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. होमी अदजानिया आणि भूषण कुमारची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या एका गाण्यामध्ये दीपिका पदुकोणचीही झलक पाहायला मिळाली होती. पण, ‘कुछ तो है तुझसे राबता’ या गाण्याच्या मुद्द्यावरुन आता एका वादाला तोंड फुटलं आहे.

https://www.instagram.com/p/BUJPb9sgKJ3/

चित्रपटामध्ये रिक्रिएटेड गाण्याचा समावेश केल्यामुळे संगीतकार प्रितमने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळातंय. त्यासोबतच त्याने चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनामध्ये आपल्याला श्रेय देण्यात येऊ नये, अशी विनंतीही निर्मात्यांना केली आहे. ‘राबता’ मधून विविध काळ साकारण्यात आले असून, ‘एव्हरिथिंग इज कनेक्टेड’ अशी टॅगलाइन असणाऱ्या या चित्रपटामध्ये आता कोणकोणत्या गोष्टींचे सूत जुळले आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.